कोल्हापूर : शाहूपुरीला एक नवीन ओळख मिळाली आहे, ती म्हणजे पेरुची गल्ली म्हणून. काही वर्षांपूर्वी पेरु मोठ्या प्रमाणात मिळत नसत. आता मात्र भरपूर प्रमाणात बाजारात विविध प्रकारच्या जातीचे पेरु मिळतात. जसे की, थायलंड, विलास जी, सरदार लखनौ अशी पेरुच्या जाती आहेत. शहरात अनेक ठिकाणी पेरुच्या गाड्या घेऊन विक्रेते थांबलेले किंवा फिरत असतात. पेरु घ्या...पेरु...असा आवाज ते देतात. अनेकजण खास पेरु घेण्यासाठी अन् खाण्यासाठी शाहूपुरीतील गल्लीत येतात. पेरु चविष्ठ अन् भरपूर प्रथिने, जीवनसत्वे, खनिजांनी युक्त असतो. विशेषत: डायबेटिस पेशंटस्ना तर पेरु अतिशय चांगला असतो. लहानांपासून मोठ्या व्यक्तिंपर्यंत पेरु आवडतो. अशा या पेरुने बाजारातील अर्थकारणाला सक्षमपणेक आकार दिला आहे. एक विक्रेता दररोज दोन ते तीन हजार रुपये पेरु विक्रीतून मिळवितो. असा हा पेरु प्रत्येकाने खायला हवा.
रिपोर्टर : अमोल सावंत
व्हिडीओ : मोहन मेस्त्री